ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण आपत्कालीन गृपच्या सदस्यांनी पाण्यात अडकलेल्या २० जणांची केली सुटका ; ज्येष्ठ महिलेचा समावेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण आपत्कालीन गृपच्या सदस्यांनी पाण्यात अडकलेल्या २० जणांची केली सुटका ; ज्येष्ठ महिलेचा समावेश.

प्रकाशन: 07 Jul 2024 08:09 PM
वाचन संख्या 826

आपत्कालीन स्थितीत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रहाणार असल्याचे दामू तोडणकर यांचे प्रतिपादन.

मालवण | प्रतिनिधी : आज धुव्वाधार पावसामुळे हुमरमळा ओरोस परिसरात भयंकर पूर स्थिती निर्माण झाली. अनेकजण पाण्यात अडकले. यावेळी प्रशासन व मालवण आपत्कालीन गृपने तिथे पोहचत पाण्यात अडकलेल्या २० जणांना सुखरूप बाहेर काढले. यात एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे.

आज रविवारच्या तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी घुसल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ हुमरमाळा परिसरात मोठया प्रमाणात पाणी वाढले. यावेळी शेतात काम करणारे १५ शेतकरी अडकून पडले. तर ओरोस फाटा या ठिकाणी काही घराच्या चारही बाजूने पाणी वाढल्याने एका ज्येष्ठ महिलेसह काही व्यक्ती अडकल्या होत्या.

दरम्यान प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा व मालवण येथील आपत्कालीन गृप त्या ठिकाणी पोहचले. बचाव कार्यासाठी होडी व सुरक्षा साहित्य आणले गेले. पाण्यात अडकलेल्या १५ शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच एका घरात अडकून पडलेल्या ज्येष्ठ महिलेला आणि एका घरात अडकलेल्या चार सदस्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

बचाव पथक मध्ये मालवण येथील आपत्कालीन गृपचे दामू तोडणकर, रोहित आडकर, संकेत जाधव, चेतन मोंडकर, यश देसाई, ओंकार देवूलकर, नितीन तोडणकर, गणेश पांगे, सिद्धेश कदम, महेश, सुमित मांजरेकर, साहिल कुबल, संकेत जाधव, बांदकर सहभागी होते. आपत्कालीन स्थितीत जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहणार असल्याचे दामू तोडणकर यांनी माहिती देताना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स