ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन पूर्तता व माहिती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन पूर्तता व माहिती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 06 Jul 2024 04:37 PM
वाचन संख्या 221

योजना माहितीकक्ष हाॅटेल ‘श्री महाराज, मालवण’ येथे ३१ ऑगस्टपर्यंत सुरु रहाणार असल्याची भाजपा महिला शहर उपाध्यक्ष सौ. वैष्णवी मोंडकर यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : मालवण पेट्रोलपंप नजिकच्या, हाॅटेल श्री महाराज येथे, विकास मालवण संस्था, फाऊंडेशन यांच्या माध्यमातून ५ जुलै रोजी सकाळी १०:३० ते ४ या वेळेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना विषयक माहिती व ऑनलाईन पूर्तता शिबीर संपन्न झाले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, अविवाहित, विधवा महिलांना होण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले गेले होते. महिला वर्गाकडून या शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. २४२ महिलांना सदर योजनेची माहिती देण्यात आली आणि ज्या महिलांचे कागद पूर्ण होते अशा १२१ महिलांचे अर्ज परिपूर्ण रित्या भरून घेण्यात आली.

ह्या योजनेची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत असल्याने तसेच अनेक महिलांचे कागद पत्र अपूर्ण असल्याने महिलानां सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत सकाळी ११ ते ४ या वेळेत योजना अर्ज व माहिती कक्ष चालू राहणार आहेत. या योजनेची माहिती तसेच महिलांचे अर्ज विनामूल्य भरून घेतले जाणार असल्याची माहिती सौ वैष्णवी मोंडकर यांनी दिली आहे.

यावेळी श्री भालचंद्र राऊत ( सिंधुदुर्ग जिल्हा एनजीओ जिल्हाध्यक्ष भाजपा), श्री विष्णू मोंडकर (भाजपा जिल्हा प्रवक्ते), श्री धोंडी चिंदरकर (भाजपा तालुका अध्यक्ष मालवण), श्री महेश मांजरेकर ( सरचिटणीस, भाजपा मालवण) तालुका तसेच संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर योजनेच्या पात्र महिलांनी रेशन कार्ड, घरपत्रक उतारा, सातबारा, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र विवाहित असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट, बँक पासबुक हे कागद घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे आणि अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे असून वय २१ ते ६५ वर्षे असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थीचे बँक खाते आवश्यक आहे. सदर योजना विवाहित, घटस्फोटित, विधवा, परितक्त्या, अविवाहित, निराधार महिलासाठी शासन राबविणार आहे. वय अधिवास दाखल्या ऐवजी १५ वर्षा पूर्वीचे जन्म प्रमाण पत्र, शाळा सोडल्याचा दाखला मतदान कार्ड, रेशन कार्ड या पैकी एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे. तसेच ज्या पात्र महिलेकडे उत्पन्नाचा पुरावा नसेल पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना या दाखल्यासाठी सूट देण्यात आली आहे. वरील निकषात बसणाऱ्या महिला बरोबरच कुटूंबातील एका अविवाहित महिलेला देखील वरील निकषात बसल्यास लाभ मिळणार आहे.

शहरातील जास्तीत जास्त महिलांनी तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या संपर्कातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सौ वैष्णवी मोंडकर, उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी मालवण शहर व अध्यक्ष विकास मालवण संस्था, फाऊंडेशन यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स