ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बॅ.नाथ पै सेवांगण यांच्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…!

बॅ.नाथ पै सेवांगण यांच्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…!

प्रकाशन: 04 Jul 2024 09:19 PM
वाचन संख्या 429

मालवण | प्रतिनिधी : शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ च्या गुणवत्ता यादीमध्ये, मालवण तालुक्यातील इयत्ता ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहर विभागातील ११ विद्यार्थी आणि ग्रामिण विभागातील ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये बॅ. नाथ पै सेवांगण च्या मालवण विभागातून ६ तर कट्टा शाखेतून २ असे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत.

शहर विभागातील : कु. लेईशा पराडकर, २४६ गुण ( तालुक्यात पहिली व जिल्हयात आठवी), कु. सोहम गवाणकर, २३४ गुण ( तालुक्यात दुसरा जिल्ह्यात १५ वा), कु. स्वरीत कोल्हे, २१६ गुण ( तालुक्यात ३रा व जिल्हयात २३ वा), कु. स्वरा बांदेकर, १९४ गुण ( तालुक्यात ८ वी व जिल्ह्यात ५३ वी) कु. मंतसा ख़ान, १९४ गुण ( तालुक्यात ९ वी जिल्ह्यात ५४ वी), कु. मीरा वराडकर, १८८ गुण ( तालुक्यात ११ वी व जिल्हयात ६० वी).

ग्रामीण विभागातील : कु. काव्या अभिमन्यू मेस्त्री, ( २२४ गुण व तालुक्यात पहिली) आणि कु. मनस्वी शैलेश परब, (१९६ गुण व तालुक्यात दुसरी.)

सेवांगण मालवण शिष्यवृत्ती वर्गाचे हे दुसरे वर्ष असून २ वर्षात १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. सेवांगण कट्टा शाखेचे हे २४ वे वर्ष असून या २४ वर्षात १५६ विद्यार्थी गुणवत्ता धारक ठरले आहेत. जुलै महिन्यात शुभारंभ होवून हा वर्ग जानेवारी पर्यंत दर शनिवारी व रविवारी सुरू असतो. विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शना बरोबरीने सराव परीक्षा घेतल्या जातात. मालवण येथे मनाली वेंगुर्लेकर व कट्टा येथे मनोज काळसेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून व इतरही काही शिक्षक मार्गदर्शन करतात.

या गुणवंतांचे सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, अध्यक्ष शाम पावसकर, कार्यवाह वैष्णवी लाड, ज्योती तोरसकर, दीपक भोगटे, कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 19
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स