ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

प्रकाशन: 04 Jul 2024 12:08 AM
वाचन संख्या 170

मालवण | प्रतिनिधी : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण यांचा, साल २०२४ सालच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २२ जून रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून फादर मॅन्युअल आणि प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस व फादर ऑल्विन फर्नांडिस उपस्थित होते.

यावेळी प्रशालेच्या वतीने कु. वैष्णवी खोत ( प्रथम क्रमांक), कु. शुभ्रा प्रभूगांवकर व कु. स्मित मयेकर ( द्वितीय क्रमांक) आणि कु. आर्या पाटील ( तृतीय क्रमांक ) यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. मृदुला केणी तसेच विद्यार्थी व यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी संस्थेच्या वतीने गुणवंतांची विशेष प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मारिया फर्नांडिस यांनी केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स