मालवणात शैक्षणिक साहित्याचे वाटप ; धक्का मित्रमंडळ सदस्यांचा उपक्रम.
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील विविध सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या ‘धक्का मित्रमंडळ’ यांच्या वतीने मालवणच्या फातिमा कॉन्व्हेंन्ट मधील मुलींना वह्या, पेन, छत्री आणि इतर शालोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले.
तसेच कन्याशाळा प्रशालेतील १५ मुला – मुलींना शालेय गणवेश तसेच आठवी ते दहावी पर्यंतच्या ७५ विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
या मदतीबद्दल दोन्ही संस्थांमधील पदाधिकारी, शिक्षक यांनी धक्का मित्रमंडळाचे आभार मानले.
यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य श्री. हेमंत शिरगांवकर, देवा तोडणकर, संजय गावडे, बाबू डायस, भूषण पिसे, नितेश जाधव, प्रणव गांवकर, राहुल केळुसकर, नितीन कोटीयान, अनिकेत मयेकर, अनिकेत चव्हाण, रोहीत चव्हाण, शंकर पाटकर, भालचंद्र आपकर, गौरेश कांबळी, मयु पारकर, केशव साठे आदी व इतर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)