ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालपे - पेडणे येथे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली ; सुदैवाने बचावली एक चारचाकी…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालपे - पेडणे येथे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली ; सुदैवाने बचावली एक चारचाकी…!

प्रकाशन: 23 Jun 2024 01:22 PM
वाचन संख्या 157

बांदा | राकेश परब : मालपे – पेडणे येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तोरसेहून पणजीच्या दिशेने असलेली भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व अन्य नुकसान झाले नाही. नियोजनाचा अभाव व अधिकार्‍यांसह आमदार, मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच निकृष्ट कामामुळे भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.

पेडणे – मालपे येथील भिंत मुसळधार पाऊस पडल्यास टिकणार नाही अशी चर्चा वाहनचालक तसेच स्थानिकांत आधीपासूनच होती. पहिल्याच पावसात महामार्गाच्या कामाचे वाभाडे निघाल्याने संबंधित कंपनीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे. सुदैवाने या ठिकाणी पोहोचलेल्या एका चारचाकीला कोणताही अपघात झाला नाही. पण एकंदरीत परिस्थितीचे आकलन करता, येत्या काळात याप्रकारच्या अनेक घटना घडून प्रवाशांच्या जिवास धोका उद्भवू शकतो. दरम्यान, भिंत कोसळताच एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तसेच पेडणे पोलिस तत्काळ हजर झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स