सौ. रुपाली इंगळे यांचे निधन ; अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांच्या पत्नी होत.
मसुरे | प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या पत्नी सौ. रुपाली इंगळे (४८ वर्ष) यांचे सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती श्री. महेश इंगळे, मुलगा प्रथमेश इंगळे, सासू श्रीमती वत्सला क. इंगळे, भावजाई श्रीमती अरूणा इंगळे असा परिवार आहे.
सौ. रुपाली इंगळे यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)