ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडीत उद्या 'ऑल दि बेस्ट रन..!'

सावंतवाडीत उद्या 'ऑल दि बेस्ट रन..!'

प्रकाशन: 01 Jun 2024 03:38 PM
वाचन संख्या 190

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन मॅरॅथाॅन धावक प्रसाद कोरगांवकर व ओंकार पराडकर यांची द. आफ्रिकेतील काॅम्रेड मॅरॅथाॅनसाठी निवड झाली आहे. अवघ्या आठवडाभरात हे दोन्ही धावक द. आफ्रिकेच्या भूमीवर त्यांचा मॅरॅथाॅन ठसा उमटवणार आहेत.

मॅरॅथाॅन धावक प्रसाद कोरगांवकर व ओंकार पराडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या सावंतवाडी येथे विशेष अशी ऑल दि बेस्ट रनचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधू रनर्स, रनर्स व PAWS यांच्या एकत्रित आयोजना द्वारे ही रन संपन्न होणार आहे.

उद्या २ जूनला सकाळी ६ वाजता सावंतवाडी राजवाडा येथून ही रन सुरु होणार आहे. त्यानंतर संपूर्ण मोती तलाव लगत फेरी मारत पुन्हा सावंतवाडी राजवाडा येथे येत ही रन संपन्न होणार आहे.
या वेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या ‘ऑल दि बेस्ट रन’ ला सर्वांनी उपस्थित रहायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स