ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शालेय यशा सोबतच आपल्याला मिळालेले संस्कार हे भविष्यासाठी उपयुक्त ; मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे

शालेय यशा सोबतच आपल्याला मिळालेले संस्कार हे भविष्यासाठी उपयुक्त ; मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे

प्रकाशन: 31 May 2024 05:19 PM
वाचन संख्या 158

मालवण नगरपरिषदेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.

आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे ते ठामपणे ठरवायची हीच वेळ आहे ; ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांचा दहावीच्या गुणवंतांना कानमंत्र.

मालवण | प्रतिनिधी : एस एस सी तथा दहावीचा निकाल लागल्यावर अवघ्या दोन नगरपालिकांनी गुणवंत मुलांचा सत्कार केला आहे त्याबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि त्यांचे सहकारी कौतुकास पात्र आहेत. पूर्वी दहावी, बारावी ही अडथळ्याची शर्यत मानली जात होती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आज गुणवत्ता पातळी वाढली आहे. सिंधुदुर्गात गुणवंतांची कमतरता नाही. मात्र येथील विद्यार्थी आयपीएस, आयएएस कडे वळत नाहीत ही खंत आहे. विद्यार्थ्यानी डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग कडे वळताना स्पर्धा परीक्षेकडे देखील वळले पाहीजे. प्रत्येकाने आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे ते ठामपणे ठरवायची हीच वेळ आहे असे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी मालवण येथे केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या वतीने इयत्ता दहावी ( एस एस सी २०२४) मधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री संतोष जिरगे. ( सोबत माजी नगरसेवक नितीन वाळके व ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई. )

मालवण नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजीत या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एस . एस. सी. चा निकाल आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पाआहे. शालेय यश व दहावीतील यश यांसोबत, जीवनात आपल्याला मिळणारे संस्कार भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला गुरु निश्चित करून त्याच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीतेकडे वाटचाल करावी. मोबाईलचा अतिरेक टाळून खूप अभ्यास करून आयुष्यात खूप मोठे व्हावे आणि स्वतः बरोबरच आपल्या देशाचे नाव मोठे करावे, असे मार्गदर्शन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री संतोष जिरगे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, नितीन वाळके यांच्यासह नगरपरिषदेचे महेश परब, सोनाली हळदणकर, आनंद म्हापणकर, दिनेश राऊत, राजा केरीपाळे यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी मालवण शहरातील शाळांनी दहावीत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल कौतुक केले. पालिकेत कर्मचारी वर्गाची संख्या कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण असताना देखील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन अल्प काळात गुणवंत मुलांचा सत्काराचा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे देखील त्यांनी कौतुक केले. दहावीच्या मुलांनी मिळवलेले गुण अतिशय महत्वाचे आहेत, याला तोड नाही. तुमच्या सोबतच तुम्हाला घडवणारे आणि दिशा देणारे शिक्षक हे देखील कौतुकाला पात्र आहेत. दहावीचा टप्पा म्हणजे जीवनाची खरी सुरुवात आहे. त्यामुळे शिक्षण घेतानाच आयुष्यात एक चांगला माणूस बनण्याचे ध्येय ठरवा. दहावीचे यश महत्वाचे असले तरीया गुणांवर तुमचं करिअर ठरत नाही. त्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक नितीन वाळके यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन खेमराज सावंत यांनी करून आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स