मालवणात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रंगीत तालीम ; तहसीलदार, पोलिस यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यत्रणेची सक्षमता व तयारी यांच्या चाचणीसाठी मालवण तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम, रॉक गार्डन परिसरात घेण्यात आली.
एका दुकानाच्या ठिकाणी सिलेंडर स्फोट होऊन आग लागली. त्यावेळी काही लोक अडकले. याबाबत माहिती मिळताच बचाव कार्यासाठी विविध यत्रणा दाखल होत तत्पर बचाव कार्य कश्या प्रकारे करतात याची रंगीत तालीम घेण्यात आली. कोणत्याही आपत्ती काळात बचाव कार्यासाठी यंत्रणा तत्पर असल्याचे दिसून आले.
यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांसह पोलीस, आरोग्य व तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)