ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे येथे जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.

तळेरे येथे जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 23 May 2024 03:57 PM
वाचन संख्या 69

तळेरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील श्रावणी कंप्युटर आणि अक्षरोत्सव परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, कवी – अभिनेते प्रमोद कोयंडे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, संजय खानविलकर, स्पर्धेचे परीक्षक अभिजित राणे, श्रावणी कंप्युटरचे संचालक सतीश मदभावे, अक्षरोत्सव परिवार प्रमुख निकेत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तीन गटात मिळून एकूण ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. या स्पर्धेसाठी शेषनाथ दामोदर मराठे यांनी सर्व बक्षिसे पुरस्कृत केली होती.

यापुढील स्पर्धेची घोषणा निकेत पावसकर यांनी यावेळी केली असून यावर्षी संवेदनशील कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या सामाजिक विषयावरच्या दोन कविता स्पर्धेसाठी देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा १ ते ४ थी, ५वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स