ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन मालवणात होणार संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन मालवणात होणार संपन्न.

प्रकाशन: 21 May 2024 07:22 PM
वाचन संख्या 107

उद्योजक डॉक्टर दीपक परब, हेमंत कोळबकर यांच्या हस्ते उद्घाटन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लाल मातीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन अशा सिंधुदुर्गच्या भूमीतील कर्तबदार अनन्यसाधारण समाजसेवेची परंपरा आणि उत्तुंग विचारधारा असणाऱ्या रत्नांची ओळख होण्यासाठी तसेच त्यांच्या अंतर्भूत प्रतिभेला वाव मिळण्यासाठी किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य, कला, पर्यटन, सामाजिक संमेलन व सन्मान सोहळ्याचे’ आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे २६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डिझाईन इंडो स्पेस लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड चे आर्किटेक्चर नीलिमा गुप्ता हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक, शिक्षणमहर्षी, समाजसेवक डॉ. दीपक परब तसेच मानसोपचार तज्ञ व उद्योजक हेमंत कोळंबकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गाचे सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे, अभिनेते व दिग्दर्शक श्री. संजय मोहिते, अभिनेत्री नृत्यदिग्दर्शिका डॉ. राजश्री खटावकर, गोव्याचे सुप्रसिद्ध गझल संगीतकार अजय नाईक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ. ना. रसनकुटे, मालवण येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. अच्युत सोमवंशी हे मान्यवर लाभणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील महनीय व्यक्तींची उपस्थितीमध्ये कौशिक गायकवाड, मोहोळ नाट्य अभिनेते नाना कोळंबकर, मच्छिंद्रनाथांची तपोभूमी चे व्यवस्थापक प्रभाकर सावंत, ज्येष्ठ साहित्यिक बाबला पिंटो, कणकवलीचे उद्योजक सुधीर जाधव, मुरबाड येथील समाजसेवक दिनेश उघडे, ठाणे येथील चित्रपट निर्मात्या सौ. नेहा निनाद धुरी, रत्नागिरी येथील नृत्य प्रशिक्षक अशोक आखाडे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोकण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या संमेलनामध्ये सुप्रसिद्ध गोव्याचे संगीतकार अजय नाईक यांचा ‘गझलरंग’ हा गाण्यांचा कार्यक्रम सकाळी संपन्न होणार आहे तसेच सिंधुदुर्गातील पारंपरिक कलांचा अविष्कार पहावयास मिळणार आहे.तसेच उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तीचा व संस्थांचा सत्कार होणार आहे. विविध भाषातील ११ पुस्तकांचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पाडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे आयोजक किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा.डाॅ.बी.एन खरात यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स