मसुरे गावठणवाडी येथे उद्या धार्मिक कार्यक्रम व दशावतार नाट्यप्रयोग.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गावठणवाडी येथील श्री समर्थ अवधुत महाराज यांच्या समाधी मंदिर कलशारोहणचा व्दितीय वर्धापनदिन सोहळा, उद्या २० मे रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी ९.०० ते ११.०० वा. धार्मिक विधी, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा. भजन, रात्रौ ९.३० वा. श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा ‘शिव अघोरी संग्राम’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन समस्त मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ, गावठणवाडी व अवधुत महाराज भक्तजन यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)