चिंदर बाजार येथील साई मंदिरात उद्या २१ मे रोजी साई भंडारा व सत्यनारायण महापूजेचे आयोजन.
आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर बाजार येथील साई मंदिरात प्रमाणे मंगळवारी २१ मे रोजी साई भंडारा व सत्य नारायण महापूजेचे आयोजन केले आहे. त्या निमित्त सकाळी ८ वाजता साई मूर्तीवर लघुरुद्र, सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, १ ते ३ यावेळेत महाप्रसाद असे कार्यक्रम असणार आहेत.
संध्याकाळी ७ वाजता स्थानिक सुस्वर भजने आणि रात्री१० मामा मोचेमांडकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘अघोरी चंड भैरव’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई समिती चिंदर बाजार यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)