ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश द्यायची प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची मागणी ; अन्यथा २० मे पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा.

नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश द्यायची प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची मागणी ; अन्यथा २० मे पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा.

प्रकाशन: 09 May 2024 03:03 PM
वाचन संख्या 95

मसुरे | प्रतिनिधी : नवनियुक्त शिक्षकांच्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची प्रक्रिया २० मे २०२४ पूर्वी पूर्ण न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने दिला आहे. पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२२ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या ६०४ व उर्दू माध्यमाच्या ११ उमेदवारांची सर्व कागदपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह ४/०३/२०२४ ते दिनांक ६/०३/२०२४ या कालावधीत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागात पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ५८६ व उर्दू माध्यमाच्या ११ उमेदवार पात्र ठरले. त्या सर्व पात्र उमेदवारांना ८ /०३/ २०२४ रोजी समुपदेशनाद्वारे काही उमेदवारांना नियुक्तीचे आदेशही देण्यात आले व त्यानंतर अचानक मध्येच समुपदेशन प्रक्रिया थांबवण्यात आली. शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत बदली करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश असल्यामुळे सदरची भरती प्रक्रिया थांबवत असल्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या (त्या दिवशी शासनाचे कोणतेच आदेश लेखी आदेश नव्हते) व त्यानंतर भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली व तब्बल पाच दिवसांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रथम करून नंतर अभियोग्यताधारक नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन करावे असे शासन निर्देश मिळाल्यानंतर सदरचे आदेश रद्द केले. जिल्हा अंतर्गत बदली बाबत कोणतेही बदली निकष नसल्याने त्याबाबत संभ्रम व्यवस्था असल्यामुळे त्याही केलेल्या नाहीत. यापूर्वी निवेदने देऊन माननीय शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन चर्चा करताना जिल्हा अंतर्गत बदली व भरती करणे याबाबत प्रशासन अजूनही संभ्रमावस्थेत आहे. ज्या कारणासाठी नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रिया थांबून दिलेले आदेश रद्द केले, त्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिये बाबत प्रशासन अजूनही उदासीन आहे असे निदर्शनास आले. त्यामुळे गेले दोन महिने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानी बरोबर नवनियुक्त शिक्षकांचेही आर्थिक व मानसिक खच्चीकरण झाल्याचे संघटनेची धारणा झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या देशात लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू असतानाही माननीय निवडणूक आयोगाने ज्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली आहे अशा ठिकाणी नवनियुक्त शिक्षक पदभरतीस परवानगी दिलेली आहे व तसे निर्देश माननीय शिक्षण संचालक पुणे व माननीय ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया ही दिनांक ७ मे २०२४ रोजी पूर्ण होत असल्याने दिनांक ८ मे पासून यापूर्वी ७ मार्च रोजी जाहीर करण्यात करण्यात आलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची प्रक्रिया २० मे २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात यावी. अन्यथा नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने सोमवार दिनांक २०/०५/२०२४ पासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर सकाळी ११ ते सायं.५.०० या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स