ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री बांदेश्वर कलशारोहण वर्धापनदिन सोहळा भक्तिपूर्ण उत्साहात संपन्न.

श्री बांदेश्वर कलशारोहण वर्धापनदिन सोहळा भक्तिपूर्ण उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 08 May 2024 10:08 AM
वाचन संख्या 121

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याचा आठवा वर्धापनदिन रविवारी ५ मे रोजी संपन्न झाला. हजारो भाविकांनी सोहऴ्यात सहभाग घेतला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री बांदेश्वर भुमिका  देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. रविवार सकाळी गणपती पूजन, देवतास नारळ, विडे अर्पण करुन सामुदायिक गाऱ्हाणे करुन सोहऴ्यास आरंभ झाला.

सकाळी ८.३० ते दु. १.०० या वेळेत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्राभिषेक अनुष्ठान ,श्री देवी भूमिका मंदिरात श्री सुक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अर्थवशिर्ष आवृत्ती जप अनुष्ठान आदी धार्मिक अनुष्ठाने करण्यात आली. त्यानंतर देवतांना नैवेद्यार्पण करुन भाविकांच्या उपस्थितीत श्री बांदेश्वर मंदिर,श्री भुमिका मंदिर व श्री गणेश मंदिरात  महाआरती करण्यात आली. सर्वांच्या कल्याणासाठी श्री बांदेश्वराला तसेच पंचायतनातील सर्व देवतांना ब्राम्हण व मानकरी यांच्याद्वारा गाऱ्हाणे घालून  महाप्रसादाला आरंभ झाला. हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. या  सोहळ्यानिमित्त  मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती.

सायंकाळी स्थानिक मंडळांची भजने तसेच युवा किर्तनकार ह.भ.प. कु.आर्या मंगलदास साळगांवकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ श्रींच्या सवाद्य पालखी सोहळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स