खासदार विनायक राऊत यांचे कार्य १०० नंबरी सोन्यासारखे अस्सल आणि आमदार वैभव नाईक यांचा नियमीत जनसंपर्क असल्यानेच जनता सदैव त्यांच्या सोबत : माजी बांधकाम सभापती यतीन खोत.
मालवणात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या बूथ क्र. १०० मधील प्रचारात कार्यकर्ते व सामान्य जनतेच्या उत्साहाची आमदार वैभव नाईक यांनी केली प्रशंसा.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा बूथ क्र. १०० मधील लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा प्रचार नुकताच संपन्न झाला. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या प्रचाराचा शुभारंभ झाला. मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांनी या प्रचारा दरम्यान सांगितले की बूथ क्र. १०० मध्ये कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. खासदार विनायक राऊत यांचे कार्य १०० नंबरी सोन्यासारखे अस्सल असल्यानेच कार्यकर्ते व सामान्य जनता त्यांच्या सदैव सोबत असल्याचा प्रत्यय नागरीकांशी संवाद साधताना आला असल्याचे यतीन खोत यांनी नमूद केले. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचेही सातत्याने जनतेशी जोडलेले असणे हे नेहमीच जन कल्याणासाठी महत्वाचे ठरत आहे असेही यतीन खोत यांनी आवर्जून सांगितले.
या आपल्या बूथ क्र. १०० मधून खासदार विनायक राऊत यांना शहरात जबरदस्त ‘लीड’ तथा मताधिक्य हे निश्चित आहे आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून खासदार विनायक राऊत यांच्यासारखेच धडाडीचे व सुसंस्कृत व्यक्तिमत्व जनतेला अपेक्षीत असल्याचे यतीन खोत यांनी सांगितले.
बूथ क्र. १०० मधील प्रचारात आमदार वैभव नाईक यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत, बाळू अंधारी, माजी नगरसेवक महेश जावकर, पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, दीपा शिंदे, नंदा सारंग, रश्मी परुळेकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, शांती तोंडवळकर, मंदार ओरसकर, वासुदेव गांवकर, हनुमंत तोंडवळकर, महेश मयेकर, संतोष सावंत, काशीनाथ मांजरेकर, किशोर मयेकर, राजा वस्त, महेश देसाई, महेश मेस्त्री, विनोद परब, आशिष परब, निखील शिंदे, जेम्स फर्नांडिस, बाबा लुईस, सरदार ताजर, प्रमिला मयेकर, हर्षदा मयेकर, निकीता म्हापणकर, तृप्ती कांबळी, वस्त काकी, शोभना चिंदरकर, शांती बांदेकर, जयश्री शेटये, दादा पारकर, संजीव बिडये, राजू गोलतकर, दिलीप पवार, अनिल मयेकर, कमलाकर खोत, सदा सावंत, अभी बिलये, उमेश परब, संजय कांदळकर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी आमदार वैभव नाईक यांचे आणि प्रचारा दरम्यान उपथित सर्वांचे व सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले, तसेच खासदार विनायक राऊत यांना सलग तिसर्यांदा निवडून आणायचे आवाहन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)