ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सर्वच ठिकाणी जनता राणे साहेबांसोबत असल्याचा विश्वास : भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर.

सर्वच ठिकाणी जनता राणे साहेबांसोबत असल्याचा विश्वास : भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर.

प्रकाशन: 30 Apr 2024 07:13 PM
वाचन संख्या 74

गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९५ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या घरोघरी प्रचाराचा आरंभ.

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीतील सर्वच पक्षांनी गावा गावातील प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून मतदाराने केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणे साहेबां सारख्या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वासामान्य जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणे साहेब सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे. मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९५ मध्ये घरोघरी प्रचाराचा आरंभ आज करण्यात आले.

सर्वच ठिकाणी जनता राणे साहेबांना साथ देणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे अशी प्रतिक्रिया सौरभ ताम्हणकर यांनी दिली. महायुतीचे सर्व पक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कार्यरत आहेत असेही ते म्हणाले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, भारतीय जनता युवा मोर्च्याचेजिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत,भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस निशय पालेकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, बूथ प्रमुख दादा कोचरेकर, चित्रा हळमळकर, आरती कोडचवाडकर, अनिशा कवटणकर, राजन परुळेकर, सर्वेश येमकर, तन्मय पराडकर, अरुण जाधव, परेश वाघ, विल्सन परेरा, तुषार खराडे, सागर पाटकर, आदेश कोचरेकर, समीर मुंबरकर, राजू कुबल, चेतन हळमळकर, विनय हळमळकर, बबन गांवकर, राजू मोरजकर, जीवन घुमाळ, चारुदत्त हिंदळेकर, प्रशांत गवंडी, अंजली गवंडी, दिशा पाटकर, गायत्री गवंडी, चित्रा वस्त, प्रसाद गवंडी, वेदा पाटकर, राजा पराडकर, दिवाकर जाधव, आदित्य मोर्जे, तन्मय येमकर, डिगू पाटील, विकास पांचाळ, निकिता गवंडी, बंड्या गवंडी, अमित सावंत, मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स