ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
एन. एम. एम. एस. (NMMS) परीक्षेत परुळे विद्यामंदिरचे उल्लेखनीय यश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एन. एम. एम. एस. (NMMS) परीक्षेत परुळे विद्यामंदिरचे उल्लेखनीय यश.

प्रकाशन: 25 Apr 2024 02:31 PM
वाचन संख्या 163

मसुरे | प्रतिनिधी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन. एम. एम. एस. (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ४ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. यावर्षीही प्रशालेने या परीक्षेतील आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

अनुष्का मिलिंद राऊळ या विद्यार्थिनीने सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात १५ वा व तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. तिने १११ गुण मिळवून हे यश संपादन केले आहे. तसेच श्रुती मधुकर राणे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. याबरोबरच साक्षी सहदेव चव्हाण व ऋतुजा बापू बागुल या विद्यार्थिनींचीही गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना ४ वर्षांसाठी दरमहा रु १०००/- (वार्षिक रु.१२,०००/-) शिष्यवृत्ती मिळणार आहे.

याबरोबरच निनाद नामदेव राणे, राजस विलास राऊळ, रुक्मिणी गोपाळ परब, कार्तिकी दादू हडकर, मयांक दिपक घारे, सोहम सुरेंद्र कोळंबकर, श्रेया उमाकांत मुंडये, जिज्ञासा कालिदास चिपकर, यश संभू चिपकर, जानवी जितेंद्र परुळेकर हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका रिमा ठाकूर, मधुरा कदम, सोमनाथ बागुल, अमेय देसाई, प्रभू पंचलिंग, वैशाली भांगरे व तेजश्री सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, संस्था उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने, पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी त्यांच्या पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स