उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारार्थ..!
सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार असून उद्या २६ एप्रिलला दुपारी २ वाजता राजापूर येथे राजीव गांधी मैदानात जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. तळकोकणात प्रथमच कमळ निशाणीवर लोकसभा निवडणुक लढविली जात आहे. त्यातच खुद्द केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे महायुती चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपासह महायुतीच्या नेत्यांनी राणेंना पूर्ण ताकद दिली आहे. उद्या राजापूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या होत असलेल्या जाहीर प्रचार सभेनिमित्त उ. बा. ठा. आमदार राजन साळवींच्या होम ग्राऊंडवर राणेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)