ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या जि. प. विभाग निहाय प्रचार सभा संपन्न.

मालवण तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या जि. प. विभाग निहाय प्रचार सभा संपन्न.

प्रकाशन: 22 Apr 2024 09:45 PM
वाचन संख्या 245

मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया- महाविकास आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी २१ एप्रिल रोजी मालवण तालुक्यात जि. प. विभाग निहाय जाहीर प्रचार सभा संपन्न झाल्या. आचरा तिठा, पोईप तिठा, कट्टा बाजारपेठ, तारकर्ली काळेथर या चार ठिकाणी सभा पार पडल्या.या सर्व सभांना कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते सज्ज झाले असून विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार यावेळी करण्यात आला. तर खा. विनायक राऊत तुम आज बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी, मंत्री दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची जी व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे ती कुठल्या पैशातून आणली असा सवाल केला. खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, गॅस, पेट्रोल, डिझेल, तेल, लाईटबील या सर्व गोष्टीमध्ये भरमसाठ महागाई वाढविणाऱ्या, सरकारी उद्योग धंदे, सरकारी कंपन्यांची विक्री करणाऱ्या आणि महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्रात बेरोजगारी वाढविणाऱ्या मोदींच्या नावाने भाजप पक्ष मते मागत आहेत. जनतेला २ रुपये देऊन १०० रु उकळणाऱ्या मोदी सरकारचा कारभार जनतेला कळून चुकला आहे. आता जनता याचा हिशेब लोकसभा निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास श्री. राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेली कार्डियाक कॅथलॅब सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. राणेंच्या खाजगी रुग्णालयाच्या फायद्यासाठी सिंधुदुर्गच्या जनतेला जिल्हा रुग्णालयात मोफत मिळणारी सेवा आता जिल्ह्याबाहेर गेली. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या राज्य सरकारच्या तिनही मंत्र्यांचे हे अपयश आहे. राणेंना जनतेचे काहीही पडलेले नाही. राणे स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचे हे आणखी एक उदाहरण आहे. खासदार विनायक राऊत हे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा कधी त्यांची जनतेला गरज भासते तेव्हा ते सहज जनतेला उपलब्ध असतात. मात्र आता त्यांच्या विरोधात असलेले राणे किती वेळा जनतेला दिसले. उमेदवारी मिळाल्याने आता ते घराच्या बाहेर पडले आहेत. १० वर्षे त्यांना जनतेचे काहीही पडलेले नव्हते.गेली ४ वर्षे केंद्रीय उद्योग मंत्री असून देखील राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकही उद्योग आणला नाही. याउलट खास. विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज आणले. जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण करून घेतले. चिपी विमानतळ सुरु करून घेतले.जिल्ह्यात डबगाईस गेलेल्या बीएसएनएल टॉवरचे जाळे निर्माण केले. तौकते वादळ ग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे जनतेचा शिवसेनेवर आणि खा. विनायक राऊत यांच्यावर विश्वास आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, जान्हवी सावंत, संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुका प्रमुख (उ.बा. ठा. )हरी खोबरेकर,काँग्रेस मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, रुची राऊत, मंदार केणी, पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, नितीन वाळके, दीपा शिंदे, श्वेता सावंत, मंदार ओरसकर, बाळा महाभोज,भाऊ सावंत,पराग नार्वेकर,पंकज वर्दम, शिवरामपंत पालव, अमित भोगले,निनाक्षी शिंदे, समीर लब्दे,बंडू चव्हाण,विजय पालव,प्रवीण लुडबे, राजेश गावकर, कमलाकर गावडे, उदय दुखंडे,अरुण लाड,विनायक परब, दर्शन म्हाडगूत,राजू मेस्त्री यांसह शिवसेना,इंडिया- महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स