खोटले येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव ; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ श्रध्दास्थान श्री क्षेत्र खोटले येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते ९ वा. काकड आरती, नित्योपासना हरिपाठ – नामधारक श्री. विजय परब, सकाळी ९ वा. श्रींचा अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती व तीर्थप्रसाद, महाभोग, दुपारी २ वा. कुंकुमार्चन, दुपारी ३ ते ६ वा. महापालखी सोहळा, नामवंत ढोलवादन, फुगडी नृत्य, चित्ररथ, दिंड्या कला पथकांचा सहभाग. रात्रौ ७ वा. बुवा श्री. भगवान लोकरे, मुंबई व सहकारी यांचे भजन, रात्रौ ७ ते १० पर्यंतच महाप्रसाद.
रात्रौ १० वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ निर्मित शिव महिमा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन स्वामी समर्थ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)