मसुरे, मागवणे येथे सरोज परब यांच्या माध्यमातून गरजू महिलेला मदत.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजू महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरजू असून उदरनिर्वाहासाठी त्यांना घरघंटीची आवश्यकता होती. याची दखल घेत माजी जी प अध्यक्ष सरोज परब यांनी स्वखर्चातून या कुटुंबाला घरघंटी घेऊन दिली. या घरघंटी मुळे या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. यावेळी मनोहर राणे, जगदीश चव्हाण, विजय परब, मृणाली परब, भारती चव्हाण, आत्माराम परब, कुशल सावंत, स्वपनील सावंत, चैतन्य सावंत, सानवी सावंत, शारदा सावंत आदी उपस्थित होते. सरोज परब यांच्या दातृत्वाबद्दल शारदा सावंत कुटुंबाने आभार व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)