ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे डांगमोडे येथे भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित  महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

मसुरे डांगमोडे येथे भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित  महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 24 Mar 2024 08:58 PM
वाचन संख्या 102

विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने  मसुरे – डांगमोडे रवळनाथ मंदिर येथील  श्रीदेवी भवानी वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक २९ मार्च रोजी  जिल्हास्तरीय पुरुष व महिला निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन डांगमोडे रवळनाथ मंदिर नजीक करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे प्रथम परितोषिक रोख रू ५०००/_, द्वितीय पारितोषिक रोख रू ३०००/_, तृतीय पारितोषिक  रोख रू १५००/_ आणि चतुर्थ परितोषिक रोख रू १५००/_ आणि विजेत्यांना  कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट खेळाडू यांना  रोख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येईल.

स्पर्धा २९ मार्चला रात्री ७ वाजता सुरू होणार असून स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघानी आपली नावे नितीन हडकर मो. ७२४९३५७२३९ किवा दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे मो. ९३७३८५५६४३ येथे संपर्क साधावा असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे  आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स