ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात १४ मार्चला  मनसेच्या नूतन शाखेचा शुभारंभ.

मालवणात १४ मार्चला मनसेच्या नूतन शाखेचा शुभारंभ.

प्रकाशन: 13 Mar 2024 01:18 PM
वाचन संख्या 176

जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे, संदीप दळवी तसेच मनविसे राज्य प्रमुख संघटक यश देसाई, प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजीया, जिल्हा अध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष केतन सावंत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी यांची उपस्थिती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या भरड नाका नजिक, हाॅटेल प्राईडच्या बाजुला मनसेच्या नूतन शाखेचा शुभारंभ उद्या, १४ मार्चला दुपारी २ वाजता होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच पक्षनिरीक्षक श्री संदीप दळवी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्याचे मनसे महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांनी जाहीर केल्याची माहिती माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे, संदीप दळवी तसेच मनविसे राज्य प्रमुख संघटक यश देसाई, प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजीया, जिल्हा अध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, उप तालुकाध्यक्ष व देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्काॅल राॅड्रीग्ज, मनविसे जिल्हा अध्यक्ष केतन सावंत यांच्यासह मनसे मालवणचे माजी पदाधिकारी अमित इभ्रामपूरकर, गुरु तोडणकर, विल्सन गीरकर, आबा आडकर, ज्येष्ठ व युवा मनसैनिक, मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मनसे महिला कार्यकर्त्या उपस्थित रहाणार आहेत.

या उद्घाटन प्रसंगी मालवण मधील मनसे माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी व मनसैनिक यांनी उपस्थित रहायचे आवाहन मालवण मनसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स