ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
धामापूर येथे चिरे वाहतूक ट्रकची दोन दुचाकींना धडक ; रस्त्यालगतचा सिमेंटच्या बेंचचेही झाले तुकडे..!

धामापूर येथे चिरे वाहतूक ट्रकची दोन दुचाकींना धडक ; रस्त्यालगतचा सिमेंटच्या बेंचचेही झाले तुकडे..!

प्रकाशन: 07 Mar 2024 08:39 PM
वाचन संख्या 346

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातल्या धामापूर येथे चिरे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी अंगावर पडल्याने मालवण वायरी येथील कुंदन हुर्णेकर हा युवक जखमी झाला. तर दुसरा एकजण सुदैवाने बचावला आहे. दरम्यान, काही तरुणांनी त्या ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला. मात्र, चालक झाडाझुडपांत पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत होते.

भरधाव वेगातील चिरे वाहतूक करणारा ट्रक केए 22 सी 8334 हा चौके येथून कर्नाटकला चिरे भरणा करून जात होता. धामापूर भगवती मंदिर समोरील वळणावर काही तरुण आपल्या दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या करून मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यातील कुंदन हुर्णेकर हा आपल्या गाडीच्या जवळ येत असताना चौकेच्या येथून येणाऱ्या ट्रकने तेथील एका दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी कुंदनच्या अंगावर पडून कुंदन रस्त्याच्या खाली फेकला गेला. त्याचवेळी ट्रकने कुंदनच्या बुलेटला धडक दिली. बुलेट रस्त्याच्या खाली जाऊन पडली. तर याच ठिकाणी प्रवाश्याना बसण्यासाठी असलेल्या सिमेंट बेंचलाही ट्रकने धडक दिल्याने त्याचे तुकडे तुकडे झाले. त्या बेंचवर एक सेंट्रिंग कामगार बसला होता. तो काही मिनिटपूर्वी उठून निघून गेल्याने सुदैवाने तो बचावला.

अपघात घडल्यानंतर ट्रक काळसे कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने निघून जात होता. कुंदन तसेच तेथील काही युवकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. काळसे येथे काही अंतरावर एका वळणावर रस्त्याच्या बाजूला ट्रक मातीच्या चरात जाऊन अडकला. त्याचवेळी चालकाने झाडी झुडपाच्या दिशेने पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातग्रस्त दुचाकींचा पंचनामा करण्यात आला. तसेच ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स