एस टी स्टॅन्डनजिकच्या श्रीराम मंदिर येथे श्री गजानन महाराज, शेगांव प्रकटदिन सोहळा उत्साहाने संपन्न ; भाविक भक्तांनी घेतला झुणका - भाकरी प्रसादाचा लाभ.
मालवण | सुयोग पंडित : मालवण एस टी स्टॅन्ड नजिकच्या श्रीराम मंदिर व प्रांगणात श्री. गजानन महाराज, शेगांव यांच्या प्रकटदिन सोहळ्याचे औचित्य साधून रविवारी ३ मार्चला विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी ५ :३० वाजता सनई चौघड्याने प्रकटदिनाच्या कार्यक्रमाची सुरवात झाली त्यानंतर श्री. गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण सुरु झाले. ८ वाजता श्री गजानन महाराजांची महापूजा विधी झाला.
दुपारी १२ वाजता आरती व नैवेद्य कार्यक्रम झाला. दुपारी १ ते ३ झुणका – भाकरी प्रसादाचा कार्यक्रम झाला ज्याचा लाभ असंख्य भाविक भक्तांनी घेतला. संध्याकाळी ४ वाजल्यापासून तीर्थ प्रसाद वाटप सुरु झाले आणि ५ वाजता अष्टपैलू कला निकेतन, मालवण यांचे भजन सादरीकरण झाले. ७ वाजता स्थानिक कलाकारांनी श्री गजानन विजय ग्रंथावर आधारीत ट्रिक सिन सादर झाला. रात्री ८ वाजता दशावतारी दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, यांचा ‘स्वामी अन्नपूर्णा’ हा पौराणिक व ट्रिकसिन्ससहीत नाट्यप्रयोग सादर झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)