ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
ओझर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओझर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

प्रकाशन: 01 Mar 2024 03:11 AM
वाचन संख्या 80

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यांच्या संशोधनामुळे राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्यात आला ते थोर भारतीय संशोधक नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी . व्ही . रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने शाळेमध्ये विज्ञान विषयावर आधारित दोन गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विज्ञान दिनाचे महत्त्व व प्राचीन ते अर्वाचीन काळातील भारतीय शोध व संशोधकांबद्दलची माहिती शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री. प्रविण पारकर यांनी व्याख्यानाद्वारे या प्रसंगी विद्यार्थ्यांना करून दिली .या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी . डी. जाधव व सहा.शिक्षक श्री. अभय शेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक शिक्षक श्री पी . के. राणे व श्री एन एस परुळेकर यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.
याप्रसंगी शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री एस.जे.सावंत, शिक्षकेतर कर्मचारी पी.व्ही. खोडके, एम.डी. परुळेकर , रविराज जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री पी. के. राणे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स