ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार.

प्रकाशन: 24 Feb 2024 04:12 AM
वाचन संख्या 76

मुंबई शिवसेना भवन येथे कुडाळ मालवण वासिय चाकरमान्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद.

मालवण | प्रतिनिधी : लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्यांना या निवडणुकीत धडा शिकवायची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस आणि कोकणी माणूस ताठ मानेने जगत आहे. गेली कित्येक वर्षे मराठी माणसाने शिवसेनेवरच विश्वास दाखविला असून यापुढेही शिवसेनेवर विश्वास दाखवावा. शिवसेनेतील गद्दारांमुळे उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली यावे लागले. मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सर्वजण उद्धवजींच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्री करूया असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईतील चाकरमानी मेळाव्यात केले. यावेळी उपस्थित चाकरमान्यांनी देखील उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांचा मेळावा बुधवारी सायंकाळी शिवसेना भवन दादर मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभूगावकर, महिला विधानसभा संपर्कप्रमुख अपूर्वा प्रभू, सावंत यांनी देखील मार्गदर्शन केले. याप्रसंगी कुडाळ मालवण मधील मुंबईस्थित चाकरमानी ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स