मालवण व कुडाळ तालुक्यातील विविध शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या भेटी.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यामध्ये मालवण तालुक्यातील आचरा, त्रिंबक, मालडी, बुधवळे, निरोम त्याचबरोबर कुडाळ शहरातील माटेवाडा, नाबरवाडी येथील स्थानिक मंडळांच्या व शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आणि कुडाळ जिजामाता चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)