ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आरोस येथे शिवजयंतीचे औचित्य साधून विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

आरोस येथे शिवजयंतीचे औचित्य साधून विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 18 Feb 2024 11:30 AM
वाचन संख्या 58

सावंतवाडी | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजावेत व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री निखिल नाईक व आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाळा परब यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आरोस येथे शिवविचार सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आरोस केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता ही स्पर्धा सुरु होणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व आकारावी बारावी अशा चार गटात ही स्पर्धा घेतली जाणार असून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागासाठी शिवकथांवर आधारीत पुस्तकही दिले जाणार आहे. यास्पर्धेचे परीक्षण रंगकर्मी श्री प्रवीण मांजरेकर आणि लेखक, कवी श्री दीपक पटेकर हे करणार आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स