ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जलजीवन मिशन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम ; मसुरे देऊळवाडा शाळेची विद्यार्थिनी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जलजीवन मिशन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम ; मसुरे देऊळवाडा शाळेची विद्यार्थिनी.

प्रकाशन: 18 Feb 2024 11:27 AM
वाचन संख्या 46

मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेची विद्यार्थीनी कुमारी तेजस्वी आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत ओरोस येथे संपन्न झाला. यावेळी तिचे पालकही उपस्थित होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रुपये २१ हजार रुपये असे पारितोषिक तिला प्राप्त झाले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. तेजस्वी आनंद मेस्त्री हिचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी वडाचापाट केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी, श्री. नवनाथ भोळे, श्री. चौधरी, सौ. मालंडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर व शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.तेजस्वी मेस्त्री हिच्या या उत्तुंग यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री. संजय माने, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य श्री. महेश बागवे, सरपंच श्रीम. सुरेखा वायंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स