मसुरे कावावाडी येथे १ मार्च रोजी नेत्र चिकित्सा शिबिर.
मसुरे | प्रतिनिधी : श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट, पेडणेकर बंधू कावावाडी व विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने १ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवासस्थान येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.- लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पेडणेकर आणि पेडणेकर बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)