आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार.
ब्युरो न्यूज | सिंधुदुर्ग : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार केला.
यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, तसेच आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जि. प. आरोग्य अधिकारी सई धुरी, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)