ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर जो राजकीय निर्णय घेतील तो मान्य :  मनसे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची भूमिका.

माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर जो राजकीय निर्णय घेतील तो मान्य : मनसे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची भूमिका.

प्रकाशन: 10 Feb 2024 02:10 PM
वाचन संख्या 146

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह काही दिवसांपूर्वी मनसे पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता मात्र त्यापुढील राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती. आता विनोद सांडव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार व ज्येष्ठ नेते परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या राजकीय भूमिकेसोबत आपण व आपले सहकारी कार्यकर्ते असू असे प्रसिद्धी संदेशाद्वारे जाहीर केले आहे.

माजी आमदार व मनसेचे माजी राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते त्यांची आगामी राजकीय दिशा कुडाळ येथील १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट करणार आहे. आमचे नेते परशुराम उपरकर जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम राहू अशी भूमिका मनसे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी स्पष्ट केली आहे.

परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्षे काम करत आहोत. संघटनेसाठी व कार्यकर्त्यां साठी तन मन धन अर्पण करत उपरकर नेहमीच कार्यरत राहिले. कार्यकर्त्याला बळ देणे त्याच्या सोबत राहणे. हे कार्य करत असताना पारदर्शक पद्धतीने जिल्ह्यात विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका राहिली. आगामी काळात कार्यकर्ते यांच्या बाजूने विचार करत तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ते जो राजकीय निर्णय घेतील त्याससोबत मालवण तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. कुडाळ येथे १८ फेब्रुवारीला होणार्या मेळाव्यात मालवण तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत. अशी माहिती विनोद सांडव यांनी दिली.

मनसे माजी शहर अध्यक्ष भारती वाघ, विध्यार्थी मनसेना उपतालुकाध्यक्ष जनार्दन आजागावकर, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत पराडकर, सर्जेकोट शाखाध्याक्ष दर्शन सावजी यांसह मिलिंद तेली, पांडुरंग करवडकर, सुदेश जामसंडेकर, विनायक परब, राजेश केळुस्कर, रुपेश केळुस्कर, दर्शन सावजी, अथर्व गोखले, मंदार पराडकर, चिन्मय पराडकर, जयेश पराडकर, प्रेमानंद पराडकर, मंदार हिंदळेकर, विभाग अध्यक्ष दिनेश तांडेल यासह अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजीनामा देत माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या भूमिकेसारखीच भूमिका घेऊन माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या आगामी निर्णयाशी सहमती दर्शविली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स