चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत रोझरी इंग्लिश स्कूलचा कु. रुद्राक्ष अरुण विठ्ठलकर राज्यात ८५ वा ; मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी.
मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण रोझरी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. रुद्राक्ष विठ्ठलकर याने राज्यात ८५ वा क्रमांक प्राप्त झाला.शासकीय रेखा कला परीक्षेला रोझरी इंग्लिश स्कूल मधून १९ विद्यार्थी बसले होते. त्यातील ५ विद्यार्थ्यांना ए श्रेणी, ५ विद्यार्थ्यांना ब श्रेणी, ९ विद्यार्थ्यांना क श्रेणी प्राप्त झाली आहे. या परीक्षेला राज्यभरातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यातून रुद्राक्ष विठ्ठलकर याला ‘ए’ ग्रेड मिळाला असून त्याचा राज्यात ८५ वा क्रमांक आला आहे. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या हस्ते कु. रुद्राक्ष याचा सत्कार करण्यात आला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)