ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पूजा ; चेअरमन महेश इंगळेंच्या हस्ते श्रीरामांना पंचामृत दुग्धाभिषेक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पूजा ; चेअरमन महेश इंगळेंच्या हस्ते श्रीरामांना पंचामृत दुग्धाभिषेक

प्रकाशन: 23 Jan 2024 06:39 AM
वाचन संख्या 23

मालोजीराजे भोसले राजेसाहेब, आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या हस्ते मंगल आरती संपन्न तर मान्यवरांचा व कारसेवकांचा महेश इंगळेंच्या हस्ते सत्कार.

मसुरे | प्रतिनिधी : अयोध्यातील ऐतिहासिक नुतन श्रीराम मंदिरातील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील पुरातन श्रीराम मंदीरातही प्रभू श्रीरामांच्या मंगल आरतीने श्रीरामांची उपासना अत्यंत भक्तीभावात पार पडली.
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व श्रीराम मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक, रामनाम जप, सत्संग महिला भजनी मंडळाची भजन सेवा, शास्त्रीय गायन, प्रसाद वाटप, दीपोत्सव इत्यादी कार्यक्रम भक्ती भावात संपन्न झाले. सकाळी ६ वाजता श्रीराम मंदीरात श्रीरामांना पंचामृताने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळी ८ ते १० या वेळेत भाविकांच्या वतीने श्रीराम नामाचे सामुहीक जप करण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महीला भजनी मंडळाची भजनसेवा संपन्न झाली. दुपारी १२ :२० ते १२:२९ च्या मुहूर्तावर अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्रींची मंगल आरती संपन्न झाली. या प्रसंगी अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेबांचा आ.कल्याणशेट्टींच्या हस्ते तर आ.सौ. व श्री.कल्याणशेट्टींचा महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थीत हजारो भाविकांना वटवृक्ष मंदीरात व श्रीराम मंदीरात मान्यवरांच्या हस्ते शिरा प्रसाद वाटप करण्यात आले.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शहरातील मल्लीकार्जून मंदीर ते श्रीराम मंदीर अखेर आ.कल्याणशेट्टी व महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो श्रीराम भक्तांच्या सहभागाने भव्य पायी शोभायात्रा संपन्न झाली. सायंकाळी ७ वाजता सर्व मान्यवर व सर्व रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीराम मंदीरात हजारो दिव्यांच्या दिपप्रज्वलनाने दिपोत्सव साजरा करून या मंगल सोहळ्याची सांगता झाली. या संपूर्ण मंगलमय सोहळयात उपस्थित मान्यवरांसह आर.एस.एस. चे तालुका प्रमुख रवी जोशी, सदस्य दत्ता कटारे, संतोष वगाले, चेतन जाधव, नगरसेवक महेश हिंडोळे, उद्योगपती विलास कोरे, श्रीराम मंदीरातील सेवक गिरीश ग्रामोपाध्ये, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, पुरोहीत मनोहर देगावकर, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिकेश लोणारी, मा.नगरसेवक रामचंद्र समाणे, मनोज शिंपी, बंडोपंत घाटगे, शशिकांत सलबते, निंगूताई हिंडोळे, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, सुरेखा पाटील, लता काळे, विजया सोनटक्के, हेमा गवळी, नंदा कटारे, प्रा.शिवशरण अचलेर, अरविंद पाटील, स्वामीनाथ लोणारी, कांत झिपरे, प्रसन्न हत्ते, संतोष जमगे, शिवानंद कार्ले, शिवशरण इचगे, अरुण शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, किरण किरात, सुनिल पवार, मल्लीनाथ गवंडी, आशिष हुंबे, जोजन आदींसह अन्य कार्यसेवक व रामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स