राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी आयोजीत रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते संपन्न.
वैभववाडी | प्रतिनिधी : अयोध्येत झालेल्या राम लल्ला प्राणप्रतिष्ठापने निमित्त तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजित रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यात प्रथम पारितोषिक विजेते – नागेश्री बेनारे यांना प्रथम पारितोषिक रुपये २०२४, द्वितीय वैभवी शेळके व उत्कर्षा चढवल रुपये १०२४ आणि तीन उत्तेजनार्थ ५२४/- विजेते सुशिमिता चोरगे,पूनम भोसले,प्रगती तावडे यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, नगराध्यक्ष नेहा माईणकर, सज्जन काका रावराणे,शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख विश्राम राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे,नगरसेविका यामिनी वळवी, भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या कदम, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, अमित कोंदुळकर, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संकेत सावंत, अनंत पवार, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस अजित शिंदे, सचिव अक्षय पंडित,खजिनदार अमोल आमकर, विद्या पाटील, गणेश पवार,राज तळेकर आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)