ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पोलिस दल आस्थापनावरील पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांची 18 ऑक्टोबरला OMR लेखी परीक्षा.

पोलिस दल आस्थापनावरील पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांची 18 ऑक्टोबरला OMR लेखी परीक्षा.

प्रकाशन: 15 Oct 2021 01:08 AM
वाचन संख्या 46
 ओरोस | प्रतिनिधी :जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनावरील एकूण 21 पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची OMR लेखी परीक्षा दि. 18 ऑक्टोबर रोजी प्रवेशपत्रांवर नमुद केलेल्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक एस.बी.गावडे यांनी दिली.

        या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र (Hall ticket) उमेदवारांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या परीक्षाकेंद्रांवर ओळखपत्रासह (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना इ.) वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी 18002100309 (सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत) bhartimahapolice@gmail.com, पोलीस भरती मदत केंद्र, 02362- 228008 व पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228614 या वर संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स