ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललिता गांधी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललिता गांधी.

प्रकाशन: 12 Jan 2024 12:46 PM
वाचन संख्या 64

मसुरे | प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीव ऐवजी लक्षद्विप अशी साद  घातली ती देशातील भुरळ पडणारे नितांत रम्य सागरी किनारे व तेथील पर्यटन विकासासाठी. आपल्या महाराष्ट्रालाही सुंदर, समृद्ध स्वर्गीय सागरी किनारा लाभला आहे या ठिकाणच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन द्यावे यासाठी सर्व पर्यटन कंपन्यानी विशेष भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे. आपल्या कोकणात अशी अनेक गावे आणि सागरी किनारे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. केवळ तारकर्ली, गणपती पुळे, मुरुड जंजिरा, दिवे आगार, अलिबागच नव्हे तर  भांडारपुळे असो की भोगवे, वेणेश्वर, अंजर्ली, दाभोळी, देवगड, कोंडुरा, कळशी , रेवदांडा,  असे अविस्मरणीय अनुभव देणारे अनेक सागर किनारे आहेत. महाराष्ट्रातील व देशातील पर्यटकांनी आवर्जून अनुभवण्यासारख्या  या सागर  किनाऱ्यांना जरूर भेटी द्याव्या आणि कोकणातील व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.
कोकण विभाग हायवे रेल्वे विमान वाहतूक व जल वाहतुकीने संपूर्ण देशाशी जोडला गेलेला असल्याने केवळ आपण स्वतः न जाता आपल्या वर्तुळातील सर्व देशपरदेशातील प्रतिनिधी आणि मित्रमंडळी या नितांत रम्य सागर किनारी जातील यासाठीही प्रयत्नशील रहावे असेही त्यांनी सांगितले.  राज्यातील एकूणच पर्यटनाला सतत प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र चेंबर गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीही चेंबर प्रयत्नशील आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांनी कोकण किनारी जास्तीतजास्त पर्यटक येतील आणि खास करून काहीशा दुर्लक्षित सागर किनाऱ्यावरील पर्यटन वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.  यादृष्टीने महाराष्ट्र चेंबरने हा विषय प्राधान्याने हाती घेतला असून त्याबाबत संबंधितांनी चेंबरशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.

देश विदेशी पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणजे गोवा राज्य. गोवा राज्याला लागूनच आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळे गोव्यात येणारा पर्यटक सिंधुदुर्ग कडे वळविणे सहज शक्य आहे. वातावरण आणि निसर्ग सौंदर्य गोव्याच्या तोडीस तोड असल्याने पर्यटक सुद्धा व्यापक प्रमाणात मार्केटिंग झाल्यास इकडे वळतील असे मत पर्यटन या विषयात डॉक्टरेट मिळविलेल्या व मसुरे गावचे सुपुत्र उद्योजक डॉ डॉ. श्रीकृष्ण उर्फ दिपक परब यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा काही किमी अंतरावर असल्याने पर्यटकांचा ओघ निश्चितच राहणार आहे. पर्यटनासाठी आवश्यक प्राथमिक सुविधा या ठिकाणी उभारल्या गेल्या असून मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे असे मत श्री परब यांनी व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स