तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विनायक कांदळगांवकर तथा 'कांदळगांवकर मामा' यांचे निधन.
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार आणि दिग्दर्शक विनायक राजाराम कांदळगावकर यांचे शुक्रवारी १५ डिसेंबरला रात्री ९ वाजता तारकर्ली येथील राहत्या घरी अल्पशः आजाराने वयाच्या ७४ व्यां वर्षी निधन झाले. त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी तारकर्ली स्मशानभूमीत बहुसंख्य नातेवाईक, ग्रामस्थ तसेच नवकलाकार नाट्य मंडळाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कांदळगावकर मामा’ नांवाने सर्वजण संबोधित असत. तर त्यांनी बऱ्याच नाटकात काम केले आणि बऱ्याच नाटकांचे दिग्दर्शन केले होते. ते कुबल रापण संघ तारकर्लीचे सभासद होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी ,विवाहित तीन मुली, जावई , नातवंडे, तसेच भाऊ, वहिनी , पुतणे, पुतण्या ,बहीण ,तीन भाचे,असा परिवार आहे. त्यांना सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)