ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
६३ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारे दोघे जण पोलिसांच्या ताब्यात..!

६३ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारे दोघे जण पोलिसांच्या ताब्यात..!

प्रकाशन: 16 Dec 2023 05:00 AM
वाचन संख्या 204

गुंतवलेली रक्कम ७ पटीने परत करू असे दाखवले होते अमिष..!

रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : गुंतवलेली रक्कम ७ पटीने प्रॉफिट देउन परतावा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल ६२ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या दोघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. फसवणूकीची ही घटना २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली होती.

संजय आण्णासाहेब कांबळे (४४, मुळ रा.संगमनेर,अहमदनगर सध्या रा.खेड,पौणे) आणि सोमनाथ चांगदेव सातपुते (४०,मुळ रा.संगमनेर,अहमदनगर सध्या रा.खेड,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात समीर सुरेश प्रसादे (४२,रा. सिध्दीविनायक नगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,संशयितांनी संगनमताने फिर्यादीला वेल्थ पासवर्ड ३१४१ या हॉटसअ‍ॅप ग्रुपवर समाविष्ट करुन घेतले होते. या ग्रुपवर वेब वर्जन अ‍ॅण्ड्रॉईड डाउनलोड ही रजिस्ट्रेशन लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांची पत्नी सिया प्रसादे हिचे नावे कंपनीचे ट्रेडिंग अकाउट ओपन केले.

त्यानंतर फिर्यादींनी गुंतवलेली रक्कम ही ७ पटीने प्रॉफिट देउन परतावा दिली जाईल असा प्लॅन त्यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. नमूद लिंकचा वापर करुन फिर्यादीची पत्नी सिया प्रसादे यांच्या बँक खात्यावरुन आरोपींना युपीआयआयडी आयएमपीएस तसेच सेव्हिंग अकाउंटवर वेळोवेळी असे एकूण ६२ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर केले.परंतु त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. या प्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी २० डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स