आमदार अपात्रतेसंबंधी निकालासाठी विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ..!
मुंबई | ब्यूरो न्यूज : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीसाठी आता सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी मिळालेला वेळ हा पुरेसा नसून त्यासाटी विधानसभा अध्यक्षांनी ३ आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती. मात्र कोर्टाने १० जानेवारीपर्यंतच वेळ दिला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा फैसला आता १० जानेवारीपर्यंत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या प्रकरणात जवळपास दोन लाख कागदपत्रे असून ती तपासावी लागतील असं कारण देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यासंबंधित निकाल देण्यासाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने आता १० जानेवारी पर्यंत वेळ वाढवून दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)