ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पुढचे श्रद्धा वालकर प्रकरण होण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद' विरोधी कायदा करावा ; समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाकडे मागणी.

पुढचे श्रद्धा वालकर प्रकरण होण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद' विरोधी कायदा करावा ; समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाकडे मागणी.

प्रकाशन: 15 Dec 2023 10:11 PM
वाचन संख्या 163

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच ‘लव्ह जिहाद’ विषयी निर्णय घेतला जाण्याची दिली ग्वाही.

मुंबई | ब्यूरो न्यूज : ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बर्‍याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात महाराष्ट्रभरात काढण्यात आलेल्या विविध मोर्च्याच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे ग्रामविकासमंत्री श्री. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार श्री. भरतशेठ गोगावले आणि आमदार श्री. प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते.

हिंदू संघटनांच्या वतीने शिष्टमंडळामध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’, ‘सकल हिंदू समाज’, ‘विश्व हिंदु परिषद’, ‘बजरंग दल’, ‘हिंदु विधीज्ञ परिषद’, ‘सनातन संस्था’, ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियान’, ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’, ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’, ‘सर्वभाषीक बाह्मण महासंघ’, ‘चित्पावन ब्राह्मण महासंघ’ आदी विविध संघटनांचे राज्यभरातील मान्यवर सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने अधिवक्ता वैशाली परांजपे, स्नेहल जोशी, सर्वश्री सुनील घनवट, शंकर देशमुख, पराग फडणीस, कमलेश कटारिया, नितीन वाटकर, धनंजय गायकवाड, कैलास देशमुख, सागर देशमुख, आशिष सुंठवाल, गौरव बैताडे, रवी ग्यानचंदानी, उमाकांतजी रानडे, राहुल पांडे, श्रीकांत पिसोळकर, अभिजीत पोलके आणि करण थोटे यांचा समावेश होता.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यांत, तालुक्यांत आणि शहारांत लाखोंच्या संख्येने ५० हून अधिक मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; मात्र आता एक वर्ष उलटून गेले आहे. तरी लव्ह जिहादविरोधी कायदा झालेला नाही. मात्र देशातील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा केला आहे. महाराष्ट्रातही लवकर कायदा व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाची मागणी आहे. या वेळी शासनाची भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सरकार कोणत्या विचारांचे आहे, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे लव्ह जिहादसंदर्भात राज्य सरकारने एक-एक करून निर्णय घ्यायला प्रारंभ केला आहे. शासनाची भूमिका काय आहे, हे आम्ही प्रतापगडावरील कृतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे शासन तुमच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. कायद्याविषयी शासनाने काय केले, यासाठी मुंबईला एक ठराविक लोकांची बैठक ठेवून त्यामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स