ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सामाजिकतेच्या नांवाखाली काही आश्रम बनतायत आसारामचे आश्रम ; सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा खळबळजनक आरोप..!

सामाजिकतेच्या नांवाखाली काही आश्रम बनतायत आसारामचे आश्रम ; सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा खळबळजनक आरोप..!

प्रकाशन: 14 Dec 2023 07:37 AM
वाचन संख्या 473

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे समाजसेवक व उद्योजक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सामाजिक ‘आश्रम’ या प्रणालीबद्दल खळबळजनक आरोप केले आहेत. केवळ जिल्ह्यातील किंवा तालुक्यातल्याच नव्हे तर आजच्या घडीला संपूर्ण देशात वेगवेगळ्या संस्था ‘आश्रम’ स्थापन करून राजरोस शासनाची व जनतेची फसवणूक करत असल्याचा संताप त्यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केला आहे. पवित्र अशा ‘आश्रम’ प्रणालीला काही ठिकाणी ‘आसारामचे आश्रम’ बनवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

काही आश्रमांमध्ये, ‘सेवा म्हणजे नक्की काय करावे’ याचे नेमके भान कुणाला नाही असे खेदाने म्हणावे लागेल असे सांगत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हणले आहे की आज जवळ जवळ आठ ते दहा दिवस खुद्द कणकवली येथे एक नव्हे तर ३ ते ४ मनोरुग्ण राजरोसपणे संपूर्ण बाजार पेठेत धुमाकूळ घालत आहेत तरी कोणी लक्ष देत नसून एरवी केवळ फोटो व बातम्या यांपुरतेच आश्रम व त्यांना मिळणारी आर्थिक मदत मर्यादित आहे असा संशय येतो. विविध सामाजिक माध्यमांतून आश्रम वाल्यांना याबद्दल आवाहन केले होते परंतुआत्तापर्यंत कोणीही याकडे लक्ष देत सुद्धा नाही आहे. या दरम्यान जर काही बरेवाईट घडले तर याची कोण घेणार जबाबदारी कोणत्या सामाजिक किंवा प्रशासकीय यंत्रणेची असेल याचाही शासन व प्रशासनाने विचार करावा. शासकीय पैसा म्हणजे सर्व सामान्य नागरिकांच्या कष्टाचा आहे, सामाजिक व्यक्ती मदत करतात ती ही कष्टांच्या पैशातूनच असते त्यामुळे ‘आश्रम’ प्रणाली स्थापन करण्याआधी जशी छाननी केली जाते तसेच त्यांच्या कार्यपध्दतीवर शासनाचे कडक लक्ष असणे आवश्यक असल्याचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. ‘बघून बघून समाजसेवा’ करणार्या आश्रमांकडे व शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्थाकडे शासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी नमूद केले आहे. या मुद्द्याची शासन दरबारी नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स