जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भाजप नेते व माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिल्या सूचना.
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिल कामगारांच्या अडचणी सोडविण्याकरिता आमदार सुनिलराणे (अध्यक्ष,गिरणी कामगार संघर्ष समिती) यांच्या दालनात, म्हाडाच्या अधिकारांच्या उपस्थित माजी आमदार .प्रमोद जठार (लोकसभा निवडणूक समिती प्रमुख रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा) यांनी बैठक आयोजित करून गिरणी कामगारांना सर्व्हीस सर्टीफिकेट मिळण्यासाठी , कामगारांना ॲानलाईन फाॅर्म भरण्याकरिता विविध कागदपत्रांसंदर्भात येणारा अडचणी अधिकारींसोबत चर्चा करून सोडवल्या. तसेच भविष्य निर्वाहनिधी (पी एफ) कार्यालयातील भविष्य निर्वाहनिधी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सदर कार्यालयात फोनद्वारे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावीत अशा सूचना प्रमोद जठार यांनी केल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)