ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चोराच्या मनात चांदणे आणि आता जमिनींचे दलाल जनतेसमोर ; माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचे टीकास्त्र.

चोराच्या मनात चांदणे आणि आता जमिनींचे दलाल जनतेसमोर ; माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचे टीकास्त्र.

प्रकाशन: 11 Dec 2023 10:35 PM
वाचन संख्या 213

आमदार वैभव नाईक व युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यावर भाडोत्री टीका करू नये असेही केले प्रतिपादन.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणवलीचे नगराध्यक्ष राहिलेल्या समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांच्यावर वैयक्तीत आरोप करून राजकारणाची पातळी घसरवणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पदाची किंमत राखली पाहिजे. शहर विकास आराखडयाबाबत सुशांत नाईक यांनी केलेले आरोप हे योग्यच आहेत. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मानतील ती भावना आहे. शहर विकास आराखडा जनतेपासून का लपवला जातोय आणि तो जनतेसमोर कधी आणणार यांचे उत्तर नलावडे आणि हर्णे यांनी का दिले नाही व सुशांत नाईक यांनी कोणत्याही जमीन दलालांची नावे घेतली नव्हती परंतु चोराच्या मनात चांदणे असल्याने केवळ टीका करण्यासाठी कणकवलीतील तीन विद्वान लोकांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावरून कणकवलीतील जमिनीचे दलाल कोण आहेत हे जनतेसमोर आले आहे अशी टीका माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी केली आहे.

रुपेश नार्वेकर पुढे म्हणाले, सुशांत नाईक यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्याऐवजी समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी केवळ वैयक्तिक टीका करण्याचे काम केले. समीर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांच्याबरोबर कशाप्रकारे गद्दारी केली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे गद्दारी केलेल्यांनी निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करू नये. आमदार वैभव नाईक यांच्या कामावर कुडाळ मालवणची जनता समाधानी आहे. अनेक चौकशा लागल्या तरी आमदार वैभव नाईक पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे राणेंनी देखील आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी कणकवलीतील भाडोत्री लोक ठेवले आहेत का असाही सवाल रुपेश नार्वेकर यांनी केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स