ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
संत रोहिदास भवनासाठी लागणारा निधी महिन्याभरात मिळेल
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

संत रोहिदास भवनासाठी लागणारा निधी महिन्याभरात मिळेल

प्रकाशन: 10 Dec 2023 06:24 PM
वाचन संख्या 34

अनिल निरवडेकर; चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या माध्यमातून गुणगौरव समारंभ

सावंतवाडी, ता. १०: संत रोहिदास भवनाच्या उर्वरित कामासाठी लागणारा दिड कोटींचा निधी येत्या महिन्याभरात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन एडवोकेट अनिल निरवडेकर यांनी आज येथे दिले. सावंतवाडी चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने समाजातील विद्यार्थी व विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी श्री. निरावडेकर यांनी समाज बांधवातील वकील, डॉक्टर पासून ते एमबीए पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत मुलांच्या यशाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्ञानाने मुंबई येथील एलआयसी अधीक्षक अभियंता रवीकिशोर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा खजिनदार नामदेव चव्हाण, संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर, जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सदस्य संजना चव्हाण, बाबुराव चव्हाण, विनायक चव्हाण, विजय चव्हाण, वसुंधरा चव्हाण, दिलीप इन्सुलकर, सुरेश पवार, पी. बी. चव्हाण, लवू चव्हाण, प्रशांत चव्हाण, सुधाकर बांदेकर, भाग्यवंत वाडीकर, वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंडू चव्हाण व जगदीश चव्हाण यांनी केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश म्हापणकर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक नंदकिशोर चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे, ते पाहूनच योग्य ते शिक्षण घेण्याची गरज असून आकलन शक्तीच्या बाहेर चे शिक्षण मुलावर लादू नका असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शिक्षणाच्या वाटा व त्या दृष्टीने व्यवसाय व नोकरी धंद्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल याबाबत करियर मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ओंकार कारिवडेकर, मयूर जाधव, सुरेश चव्हाण, गौरवी बांबुळकर, प्रज्ञा साळगावकर, देवराज कारिवडेकर, गौरवी सांगेलकर, श्रेयस चव्हाण तसेच अरुंधती चव्हाण, डॉ. प्रथमेश चव्हाण, डॉ. अंकिता सांगेलकर, यशस्वी सरंबळकर डॉ. यश पवार, आयुष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्मशानभूमीत अहोरात्र काम करणारे मारुती निरवडेकर यांचा खास सत्कार यानिमित्ताने करण्यात आला. यावेळी समाज भूषण पुरस्कार प्राप्त आणि कोलगाव विविध विकास सहकारी सोसायटीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल बाबुराव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला, तसेच सैनिक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल शांताराम पवार यांचाही सत्कार करण्यात आला. सावंतवाडी तालुका चर्मकार बांधवांना एकत्र करून विविध प्रकारचे उपक्रम राबविल्याबद्दल सावंतवाडी चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणेश म्हापणकर या निमित्ताने उभयतांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी तसेच बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये तृप्ती चव्हाण यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन जगदीश चव्हाण यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स