सिंधुदुर्ग मध्ये होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला बांदा परिसरातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचा ठराव
बांदा परिसरातील प्रत्येक वाडी निहाय सभा घेऊन नियोजन
बांदा/राकेश परब : बांदा सिंधुदुर्ग मध्ये होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थित होण्यासाठी बांदा परिसरातील मराठा समाजातील मराठा बांधवांसाठी जनजागृती करण्यासाठी बांदा मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक वाडी निहाय सभा घेण्यात आल्या. यामध्ये देऊळवाडी,सटमटवाडी, लकरकोट, मीठगुळी, गडगेवाडी,निमजगावाडी,गवळी टेम्ब, मोर्येवाडी, काळसेवाडी, पानवळ, बळवंत नगर,आगडीवाडी,डोंगरआळी अशा एकूण पाच सभा घेण्यात आल्या. यामध्ये मनोज जरागे पाटील यांच्या सभेसाठी जाण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात येईल याची चर्चा करण्यात आली. तसेच या सभेसाठी जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित होण्यासाठी सर्व मराठा बांधवांना आरक्षण का मिळाले पाहिजे या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यासाठी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, उपाध्यक्ष परिमल सावंत, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये, खजिनदार महादेव सावंत, बांदा मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत महिला बांदा मराठा समाज अध्यक्षा स्वाती सावंत, अवंती पंडित, ममता सावंत, दिक्षा सावंत, राखी कलंगुटकर, स्मिता परब, माधवी गाड, बांधा मराठा समाज प्रसिद्धीप्रमुख राकेश परब,तसेच सर्व पदाधिकारी,सदस्य सल्लागार सर्व सभासद यांनी परिश्रम घेतले. बांदा मराठा समाज च्या नूतन कार्यकारणी ने अध्यक्ष विराज परब यांनी या वाडिनिहाय सभेचे नियोजन केल्याने याचा फायदा बांदा मराठा समाज बांधवाना होणार आहे. मनोज जरागे पाटील यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे ठरवण्यात आले.फोटो कॅप्शन बांदा मराठा समाजाच्या वाडी निहाय सभेला उपस्थित सर्व मराठा बांधव छाया :-
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)