ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद - प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद - प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

प्रकाशन: 10 Dec 2023 06:20 PM
वाचन संख्या 32

आचरा (प्रतिनिधी) : हॉस्पिटल नाका कला व क्रीडा मंडळ,वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवक – युवतीनी उस्फूर्त पणे सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले. रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार अर्पण करून, तसेच दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रसंन्ना (बाळू) देसाई म्हणाले की, रुग्णसेवेमध्ये रक्तदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्त जेंव्हा अनिवार्य असते तेंव्हा ते मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते. रक्तदात्यांना संघटीत करून एकत्र आणण्याच्या दृष्टीने एकच व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार घेऊन, रक्तदान ही चळवळ बनवुन काम करणाऱ्या ” सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान” चे कौतुक केले. तसेच युवा पिढीमध्ये रक्तदानाची आवड निर्माण केल्याबद्दल हॉस्पिटल नाका कला क्रीडा मंडळाचे आभार मानले.उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष अॅड. मनिष सातार्डेकर यांनी प्रसंन्ना देसाई, शाम कौलगेकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे अॅलीस्टर ब्रीटो, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढीचे डॉ. अजय शिराळे, निलेश गवस, सुरेंद्र चव्हाण इत्यादी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मंडळाचे योगेश गोवेकर, करण निरवडेकर, आनंद कळेकर, रुपेश सावंत, सचिन मांजरेकर, मनीष कळेकर, प्रफुल्ल सावंत, सौरभ धुरी, रामचंद्र सावंत, कौस्तुभ मयेकर, वैभव भोसले, सौरभ भोसले, आस्वाद पोतनीस, भूषण सारंग, प्रशांत गावडे, कौस्तुभ गवसइत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश गोवेकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स